मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर पहिला एकदिवसाचा सामना खेळवला गेला. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले आहेत. त्यापैकी एक म्हणजे थलायवा म्हणजेच दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत. पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेले रजनीकांत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबत बसलेले दिसले. रजनीकांत त्यांच्या क्रिकेट प्रेमासाठी ओळखले जातात. ते अनेकदा चेन्नईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना उपस्थित राहतात. भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. हार्दिक पांड्याने टी-20 मध्ये कर्णधारपद भूषवले असले तरी तो प्रथमच एकदिवसाच्या सामन्यामध्ये कर्णधार आहे. यासह, तो एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा 27 वा खेळाडू ठरला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा