सेऊल : दक्षिण कोरियाच्या लष्कराने दावा केला आहे की, गुरुवारी उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. योनहाप वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्व किनार्‍यापासून पाण्यात डागण्यात आले. उत्तर कोरियाकडून वाढत्या लष्करी आणि आण्विक धोक्यांमुळे वॉशिंग्टन आणि सोलने संरक्षण सहकार्य वाढवले आहे. उत्तर कोरियाने अलिकडच्या काही महिन्यांत परमाणुशस्त्रांची चाचणी केली आहे.

दक्षिण कोरिया आणि जपानच्या नेत्यांची टोकियोमध्ये बैठक होणार होती. या बैठकीच्या काही तास आधी उत्तर कोरियाने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली आहे. दक्षिण कोरिया आणि जपानच्या नेत्यांच्या बैठकीच्या अजेंड्यावर प्योंगयांगचे क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रम होते. तसेच दक्षिण कोरिया आणि अमेरिका संयुक्त युध्द सराव करत आहेत. उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे डावपेच म्हणजे हल्ल्याची तालीम आहे.

रविवारी डागले क्रूझ मिसाईल

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठा युद्ध अभ्यास सुरु झाल्यानेही उत्तर कोरियाने मंगळवारी दोन लहान-पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, असे दक्षिण कोरियाच्या सैन्याने म्हटले आहे. याआधी रविवारी, प्योंगयांगने अमेरिका-दक्षिण कोरिया युध्द सरावाच्या निषेधार्थ पाणबुडीतून दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. फ्रीडम शील्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्यातील युध्द सराव सोमवारी सुरू झाला असून, तो 10 दिवस चालेल. मित्र राष्ट्रांनी म्हटले आहे की, फ्रीडम शील्ड सराव उत्तर कोरियाच्या दुप्पट आक्रमकतेमुळे बदलत्या सुरक्षा वातावरणावर केंद्रित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा