काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल @PM_Nepal यांचे अधिकृत ट्विटर गुरुवारी पहाटे हॅक करण्यात आले. त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी त्यांच्या अकाउंंटवरून डिजिटल चलनाचा प्रचार करण्यासंबंधीचा संदेशही ट्विट केला आहे. त्यामुळे आता नेपाळचे पीएम दहल यांच्या प्रोफाइलऐवजी BLUR असे खाते दिसत आहे. प्रो ट्रेडर्ससाठी हे नॉन-फंजिबल टोकन मार्केटप्लेस आहे.ट्विटर खात्यावर, @PM_Nepal च्या खात्यावरून NFT च्या संबंधी एक ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये असे लिहिले आहे की समन्स बजावणे सुरू केले आहे. तुमचा BAKC किंवा SewerPass तयार करा! https://thesummoning.party पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सहा लाख ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा