नवा दिल्ली : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव 25 मार्च रोजी सीबीआयसमोर हजर होणार आहेत. यापूर्वी सीबीआयने त्यांना तीन वेळा चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तेजस्वी यादव यांना अटक केली जाणार नाही, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे. सीबीआयने तेजस्वी यांना 4 आणि 11 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यावेळी ते गेले नाहीत. या प्रकरणी सीबीआयने 4 मार्च रोजी राजद सुप्रीमो आणि तेजस्वी यांचे वडील लालू यादव यांची चौकशी केली होती. तसेच 11 मार्च रोजी लालूंच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची केंद्रीय एजन्सीने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी चौकशी केली.

Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing