अध्यक्ष मॅक्रॉन यांचा आदेश

पॅरिस : फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय 64 असेल, असा आदेश अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी दिला. विशेष म्हणजे संसदेत या संदर्भातील विधेयकावर मतदान घेण्यात आले नाही. या निर्णयामुळे फ्रान्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. कामगार संघटना आणि विरोधी पक्षांन मॅक्रॉन यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 करण्याचे विधेयक मॅक्रॉन यांनी आणले होते. ते संसदेत सादर करुन मतदान घेतल्यानंतर लागू करणे अपेक्षित होते ; परंतु शुक्रवारी विधेयक देशात लागू केल्याची घोषणा केली. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष आणि कामगार संघटनांनी आंंदोलनाची तयारी सुरू केली आहे. तसेच पंतप्रधान एलिझाबेथ बोमे यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात त्यावर मतदान अपेक्षित आहे.

मॅक्रॉन यांनी पंतप्रधान बोमे यांना आदेश दिला की, विशेष अधिकाराचा वापर करुन विधेयकावर मतदान न करताच ते लागू करावे. दरम्यान, या वादग्रस्त विधेयकाला पूर्वीपासून जोरदार विरोध केला जात होता. विरोधी पक्षाचे खासदार, कामगार संघटना आणि नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून निदर्शने आणि आंदोलने करत आली आहेत. आता विधेयक लागू करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची भावना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा