नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारताने रशियाला अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून रोखले आहे. भारताच्या या प्रयत्नांचे नॉर्वेजियन नोबेल समितीचे उपनेते असल तोजे यांनी गुरुवारी कौतुक केले आहे. तसेच, यातून भारताने जगाला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची गरज असल्याचे दाखवून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा हस्तक्षेप उपयुक्‍त

अण्वस्त्र वापरण्याचे परिणाम रशियाला लक्षात आणून देण्यासाठी भारताचा हस्तक्षेप खूप उपयुक्त ठरला. ते म्हणाले, भारत नेहमीच सर्वांसोबत मैत्रीपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला त्याची अधिक गरज असल्याचे तोजे यांनी सांगितले.

भारत महासत्ता बनणार

तोजे यांनी भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुकही केले. भारत हा शांततेचा वारसा असून, महासत्ता बनणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केल्याने ते सर्वात विश्वासू बनले नेते आहेत. ते निश्चितपणे जगात शांतता प्रस्थापित करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नसून जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही काम करत आहेत. जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा