पुणे : अवकाळी पावसामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. त्यामुळे गुरूवारी बाजारात येणारे आडते, व्यापारी, कामगार, खरेदीदाराचीं गैरसोय झाली. चिखलातून चालताना सर्वांनाच काळजी घ्यावी लागली. या चिखलाचा व्यापारावरही परिणाम झाला.

बुधवारी मध्यरात्री मोठा पाऊस झाला. त्यामुळे चिखल झालाच होता. त्यात खराब झालेली फळे रस्त्यावर टाकण्यात आल्याने चिखलात भर पडली. त्यावरून वाहने गेल्याने राडारोडा वाढला होता. त्यामुळे चिखल आणि खराब फळांच्या राडारोड्यामुळे चिखलातून चालणे अशक्य होत होते. या चिखलापासून काही प्रमाणात दुर्गंधी येत होत होती. त्यामुळे खरेदीसाठी येणार्‍यांनी चिखलामुळे बाजारात अधिक फिरणे टाळले. फळबाजारातील रस्त्यावरील कचरा रोज वेळेत उचलला जात नसल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली.

दुसरीकडे याच चिखलाच्या रस्त्यावर पपई, आंबे, चिक्कू, कलिंगड, सफरचंद, मोसंबी यासह विविध फळे उघड्यावर विकली जात होती. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फळ बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, खरेदीदार व्यापार्‍यांची गर्दी होत असते. मात्र गुरूवारी रस्त्यावरील राडारोड्यामुळे सर्वांना चालण्यासाठी कसरत करावी लागली. याच चिखलातून खरेदीदारांना, हमालांना मालाचे ओझे घेऊन बाजारात फिराव लागत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा