नवी दिल्ली : देशात चार महिन्यांनंतर 700 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 चोवीस तासांत 754 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 327 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 623 वर पोहोचली.

एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 46 लाख 92 हजार 710 वर पोहोचली. त्यापैकी, 4 कोटी 41 लाख 57 हजार 297 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 5 लाख 30 हजार 790 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. काल एका बळीची नोंद झाली.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के असून, मृत्युदर 1.19 टक्के आहे. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी 734 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा