युक्रेन युद्धात मध्यस्थीसाठी पुढाकार
बीजिंग : चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग लवकरच रशियाच्या दौर्यावर जाणार आहेत. सोमवारी ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
रशिया आणि युक्रेन युद्धात शांतता चर्चा करण्यासाठी चीन उत्सुक आहे. दोन्ही देशांतील युद्ध समाप्त व्हावे, दोन्ही देशांत मध्यस्थी करण्यासाठी चीन तयार आहे. त्यासाठी झी हे रशियाच्या दौर्यावर जात असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ छियांग यांनी सांगितले की, पुतीन यांच्या निमंत्रणावरून झी हे रशियाच्या दौर्यावर जात आहेत. 20 ते 22 मार्च दरम्यान ते रशियात असतील. अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त झाल्यानंतर झी यांचा हा पहिला परदेश दौरा असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.