पुणे : संगणकीय प्रणालीतील तांत्रिक बिघाड अख़ेर दूर झाला असून मागील दोन आठवड्यांपासून रखडलेला पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) सोडतीचा निकाल येत्या सोमवारी (दि.20) सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृकश्राव्य उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचे ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पुणे म्हाडांतर्गत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पुणे ः गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात सोडत काढली होती. या सोडतीसाठी प्रथमच इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) 2.0 या नूतन प्रणालीचा वापर करून पुणे आणि चिंचवड महापालिका हद्दीत आणि इतर विभागात सहा हजार 58 सदनिकांसाठी सोडत काढून अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. कागदपत्रांच्या अडचणी, छाननी, तपासणी, प्रमाणीकरण आदी टप्पे पार पाडल्यानंतर 58 हजार 467 इच्छुकांनी पैसे भरले. सात मार्च रोजी सोडतीचा निकाल जाहीर होणार असताना प्रणालीतील तांत्रिक बिघाड असल्याने सोडतीचा निकाल लांबविण्यात आला.

आयएलएमएस 2.0 या ऑनलाईन प्रणालीचा अर्जदारांना पहिल्या दिवसापासून फटका बसला असताना याचा परिणाम म्हाडाच्या अर्जांवर देखील झाला असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात सोडतीमध्ये प्रधानमंत्री योजनेतील 637 सदनिका असून म्हाडा व सर्वसमावेश (20 टक्के) गृहनिर्माण योजेनेंतर्गत प्रथम येणार्‍यास प्राधान्य योजनेतील दोन हजार 938, तर पुणे 1611 आणि पिंपरी चिंचवड 872 महापालिका हद्दीतील सर्वसामान्य योजनेतील दोन हजार 438 अशा एकूण सहा हजार 58 सदनिकांचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

यावेळी दृकश्राव्य माध्यमातून होणार्‍या सोडतीच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित राहणार आहे, तर विजेत्यांना म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच युट्यूब चॅनलवर निकाल पाहता येणार असून विजेत्यांची यादी देखील दुपारनंतर म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा