पिंपरी : इनफ्लूएंझा एच3एन2 या विषाणूच्या रुग्ण संख्येत राज्यभरात वाढ होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात 1 जानेवारी 2023 पासून इन्फ्लूएंझा एच3एन2 बाधित चार रुग्ण आढळून आले यापैकी तीन रुग्ण बरे झाले, तर आज 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

पालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय व कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे इन्फ्लूएंझा एच3एन2 या विषाणूचे रुग्णांसाठी प्रत्येकी 10 खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. पालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, इन्फ्लूएंझा एच3एन2 या विषाणूस घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/ रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. सदर आजारावर औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोपने यांनी केले आहे. दरम्यान, शहरात एच3एन2 संसर्गामुळे वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी मुंबइहून त्वरीत शहरात धाव घेतली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे उपस्थित होते.

एच3एन2 चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10 बेड राखून ठेवावेत, ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी, संबंधित रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिंकांमध्ये जागृती करावी अशा सूचना लांडगे यांनी केल्या. डॉ. गोफणे म्हणाले की, आज या आजारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित मृत व्यक्तीचे वय अनेक व्याधी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत, नागरिकांनी भयभीत होऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही लक्षणे दिसल्यास तात्कळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

एच3एन2मुळे पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्धाचा बळी

पिंपरी एच थ्री एन टू आजारामुळे आज पिंपरीत 73 वर्षीय एका वृद्धाचा मृत्यू झाला. सदरच्या रुग्णाला दमा व हृदयाचा त्रास होता त्याला दिनांक सात मार्च रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुटीन तपासणी केल्यानंतर एच थ्री एन टू तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास सदर रुग्णाचे निधन झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफने यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा