नवी दिल्‍ली : राजस्तानातील भिवडी शहर देशातील सर्वाधिक आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. या संदर्भात 131 देशांतील 7 हजार 323 शहरांचा अभ्यास स्वित्झर्लंड येथील आयक्यू एअर संस्थेने गेल्या वर्षी केला होता. हवेच्या प्रदूषणाचे मानक असलेल्या पीएम 2.5 चा विचार केला तर भिवडीतील प्रदूषणाची पातळी 92.7 एवढी असल्याचे आढळले. शहरातील प्रदूषणाचे प्रमुख कारण तेथील कारखाने आहेत. त्यांची संख्या दोन हजार आहे. प्रदूषणाचा विचार केला नवी दिल्‍ली, ग्रेटर दिल्‍ली 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. नवी दिल्‍ली प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात भारतातील 39 शहरांचा समावेश आहे. संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील प्रदूषित शहरातील हवेची शुद्धता तपासली जाते. त्यानुसार सरासरी काढून प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली जाते. अन्य प्रदूषित शहरांमध्ये पाटणा, मुझफ्फरनगर, दरभंगा, नोएडा, गुरगांव, बुलंद शहर, मेरठ, चाकी दादरी, जिंद, गाझियाबाद, फरिदाबाद, दादरी, हिसार आणि ग्रेटर नोएडाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा