अमेरिकेने चीनला सुनावले, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग

वॉशिंग्टन : द्विपक्षीय सिनेटच्या ठरावानुसार अमेरिकेने मॅकमोहन रेषेला चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

सिनेटर जेफ मर्क्ले यांच्यासह सिनेटर बिल हॅगर्टी यांनी सिनेटमध्ये एक ठराव मांडला. सिनेटचा सदस्य जॉन कॉर्निन यांनी हा ठराव पारित केला. यावेळी जॉन कॉर्निन म्हणाले, चीन इंडो-पॅसिफिक सागरात धोका ठरत आहे. अशा वेळी अमेरिकेसह या भागातील अनेकांनी एकत्रित येऊन लष्करी रणनीती आखून, भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे महत्त्वाचे आहे.

या द्विपक्षीय ठरावात अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता देण्यासाठी मी सिनेटचा पाठिंबा व्यक्त करतो, असे सांगत जॉन कॉर्निन म्हणाले, नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्यासाठी चीनच्या लष्करी आक्रमणाचाही आम्ही निषेध करतो. यापुढे अमेरिका-भारतासोबत लष्करी संबंध वाढविण्यावर भर देणार, तसेच क्वाड फ्री आणि ओपन इंडो-पॅसिफिकचे आम्ही समर्थन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नियंत्रण रेषेजवळील पूर्वेकडील क्षेत्रात भारत आणि चीन यांच्यात सहा वर्षांच्या भांडणानंतर हा प्रस्ताव आला आहे. तो असा आहे की, युनायटेड स्टेट्स मॅकमोहन रेषेला चीन आणि भारतीय राज्य अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देते. हा ठराव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) च्या अरुणाचल प्रदेश हा पीआरसी प्रदेश असून, जो पीआरसीच्या वाढत्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणांचा एक भाग असणार्‍या दाव्याच्या विरोधात आहे.

अमेरिकेचा पाठिंबा

मर्क्ले म्हणाले, हा ठराव स्पष्ट करतो की युनायटेड स्टेट्स भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला भारतीय प्रजासत्ताकचा भाग मानते, ते चीनचे पीपल्स रिपब्लिक मानत नाही. त्यामुळे अमेरिका समान विचारधारा असणार्‍यांचे समर्थन आणि साहाय्य करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे.

चीनचा निषेध

या ठरावात चीनकडूनचिथावणीखोर कारवायांचा निषेध करण्यात आला. यामध्ये नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्यासाठी चीनने लष्करी बळाचा वापर केला, वादग्रस्त भागात गावांचे बांधकाम केले, भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील शहरांसाठी मँडरीन भाषेतील नावांसह नकाशे प्रकाशित केले आणि भूतानवर पीआरसी क्षेत्रावरही केलेल्या दाव्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा