वैमानिकाचा शोध सुरू
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चिता हेलिकॉप्टर कोसळले. वैमानिकाला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सैन्य अधिकाऱ्यांकडून अपघाता संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्ता हेलिकॉप्टरचा आज सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटला, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली. बोमडिला मॅन्डला वेस्टजवळ या चिता हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाली.
अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळील ऑपरेशनल सॉर्टी राबवण्यात आले आहे. सॉर्टी म्हणजे जेव्हा सैनिकांच्या एका गटाला एका विशिष्ट मिशनवर पाठविले जाते, तेव्हा त्याला ऑपरेशन सॉर्टी म्हणतात. ऑपरेशन सॉर्टी अंतर्गत एक लढाऊ वैमानिक लक्ष्य बॉम्ब टाकून परततो, खरं तर तो एक मिशनचा भाग असतो. चिता हेलिकॉप्टरच्या वैमानिकालाचा आज सकाळी ०९: १५ च्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटल्याची नोंद आहे.
बोमडिला मॅन्डला वेस्टजवळ हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशमधील पोलिसांनी सांगितले की, सैन्याचे हेलिकॉप्टर हवेत असताना त्यांचा संपर्क तुटला आणि मिसामारीकडे जाणाऱ्या रस्ते मार्गातही ते सापडले नाही. दुपारी १२.३० वाजता बंगजालेप, दिरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर पाहिल्याचे सांगितले.