एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अपघातात रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले आहेत. भानुदास दामू गोरे (वय 58, रा. सोरतापवाडी, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरे यांचा मुलगा सुमीत (वय 25) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात भरधाव मोटारीने सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षातील प्रवासी भानुदास गोरे, रिक्षाचालक दिनेश शिर्के, सुनीता जगताप, विष्णू शिर्के, त्यांची पत्नी छाया, इंदू जगताप जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या गोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा