न्यूझीलंडमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचे नोंदवण्यात आले. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या केरमाडेक बेट येथे १० किलोमीटवर खोलीवर आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला.

गुरुवारी ( १६ मार्च ) सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के ७.१ रिश्टर स्केल असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेत नोंदवण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ३०० किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.

न्यूझीलंडमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. कारण, ते पॅसिफिक प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेटच्या सीमेवर वसले आहे. तसेच, हे ‘रिंग ऑफर फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र भूकंपीय प्रदेशाच्या काठावर आहे. दरवर्षी न्यूझीलंड हजारो भूकंपाच्या धक्क्याने हादरले जाते.

टर्की आणि सीरिया ६ फेब्रुवारीला भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपात ५० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा