अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा कसोटी सामना झाला. या सामन्यात शुबमन गिल शानदार फलंदाजी केलीे. पाहुण्या संघाच्या 480 धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेे चांगली सुरुवात केली. यादरम्यान गिलने कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतकही पूर्ण केले. या खेळीदरम्यान गिलने मिचेल स्टार्कची जोरदार धुलाई करताना विश्वविक्रम केला.
शुबमन गिल आता एकदाही बाद न होता, कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानच्या नावावर होता. युनूस खानने पहिल्यांदा आऊट होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाजाविरुद्ध 112 धावा केल्या होत्या, मात्र अहमदाबाद कसोटीत गिलने त्याचा विक्रम मोडला आहे. शुबमन गिलने वैयक्तिक धावसंख्या 103 पर्यंत पोहोचवली असून या डावात त्याने आतापर्यंत 10 चौकार आणि 1 आकाशी षटकार लगावला आहे.
टीम इंडियाने तिसर्या दिवसाची सुरुवात 36 धावांपासून केली. भारताने पहिल्या सत्रात एकूण 93 धावा जोडल्या. त्याचबरोबर लंच ब्रेकपर्यंत धावफलकावर 1 गडी गमावून 129 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने आतापर्यंत कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने एकमेव बळी गमावला. ज्याला 35 च्या वैयक्तिक स्कोअरवर कुहनेमनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. ख्वाजाने 422 चेंडूंचा सामना करत 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या, तर कॅमेरून ग्रीनने 114 धावा करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. ख्वाजाने खेळलेले हे चेंडू भारत दौर्यावर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाने खेळलेले सर्वाधिक चेंडू आहेत.