मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा चित्रपट पठाणने सलग पन्‍नास दिवस चित्रपटगृहात झळकण्याचा मान पटकावला आहे. जगभरातील विविध चित्रपटगृहांत चित्रपटाने सलग ५० दिवस पूर्ण केल्याचा आणखी एक विक्रम केला.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत एक हजार कोटीचा व्यवसाय केला आहे. यश राज फिल्मची निर्मिती असलेल्या चित्रपटात शाहरूख खानसह जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी अभिनय केला आहे. जगभरात चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल यशराज फिल्मचे उपाध्यक्ष आणि वितरक रोहन मल्होत्रा यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच चित्रपटगृहात सलग 50 दिवस चित्रपटाने पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला आहे. चाहत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे पठाणने हे यश संपादन केल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा