पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात भारताच्या वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश केलेल्या निकी कालियांदा पूनाचा याला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत झेक प्रजासत्ताकच्या अकराव्या मानांकीत डोमिनिक पालन याने भारताच्या निकी कालियांदा पूनाचा याचा 6-4, 6-1 असा पराभव करत भारताचे पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आणले. जागतिक क्रमांक 359 असलेल्या दक्षिण कोरियाच्या सातव्या मानांकीत युनसेंग चुंग याने 1तास 25मिनीट चाललेल्या समान्यात जागतिक क्रमांक 299 असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या अव्वल मानांकीत जय क्लार्क याच 7-6(0), 6-3 याचा असा पराभव करत मुख्य फेरीत धडक मारली. जपानच्या बिगर मानांकीत माकोटो ओचीने स्पेनच्या आठव्या मानांकीत कार्लोस सांचेझ जोवरचा 6-2, 6-4 असा एकतर्फी लढतीत पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. सर्बियाच्या दुस-या मानांकीत निकोला मिलोजेविक याने ऑस्ट्रेलियाच्या डेने केली याचा 7-6(0), 6-4 असा तर ऑस्ट्रेलियाच्या अकिरा सँटिलन याने नॉर्थ मारियाना आयलँडरच्या कॉलिन सिंक्लेअर याचा 6-7(5), 7-5, 6-2 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला.
Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing