इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना तीन दिवसही खेळला जाऊ शकला नाही. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला ‘खराब’ म्हटले आहे. खराब रेटिंगमुळे इंदूरलाही 3 डिमेरिट गुण मिळाले आणि हे गुण पाच वर्षे सक्रिय राहतील. आता खेळपट्टीच्या वादावर एक महत्वाची माहीती समोर आली आहे. हाती आलेल्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंदूरच्या खेळपट्टीला दिलेल्या खराब रेटिंगला औपचारिकपणे विरोध केला आहे. बीसीसीआयच्या अधिकार्याने नुकत्याच पाठवलेल्या औपचारिक पत्रात क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी होळकर स्टेडियमवरील खेळाच्या खेळपट्टीवर केलेल्या टीकेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. रेटिंग 3 डिमेरिट पॉइंट्ससह येते जे पाच वर्षांच्या रोलिंग कालावधीसाठी सक्रिय राहील.
आता भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने म्हणजेच बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी खेळपट्टीच्या रेटिंगचा रिव्ह्यू करण्यासाठी आयसीसीला पत्र पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. खेळपट्टीबाबत सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दाखल केलेल्या अहवालावर भारतीय बोर्डाने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. बीसीसीआयने आयसीसीला एक मेल पाठवला आहे, ज्यामध्ये या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि खराब रेटिंग सरासरीपेक्षा कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता आयसीसीची द्विसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करून अंतिम निर्णय घेईल. या समितीमध्ये आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान (पाकिस्तान) आणि क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली मॅच रेफरी ब्रॉड यांच्या अहवालाची पुन्हा तपासणी करतील. या अपीलच्या 14 दिवसांत आयसीसीला अंतिम निर्णय घ्यावा लागेल.
मागे 1 ते 5 डिसेंबर दरम्यान, जागतीक कसोटी स्पर्धेअंतर्गत रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यानंतर आयसीसीने रावळपिंडीची खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी असल्याचे घोषित केले होते. आणि एक डिमेरिट पॉइंट दिला होता.
यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अपील केले आणि आयसीसीला या निर्णयावरुन एक पाऊल मागे घ्यावे लागले. पाकिस्तानच्या आवाहनानंतर आयसीसीने आपला निर्णय मागे घेतला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, अपील ही नेहमीच केली जाते, कारण असे वाटते की, रेटिंग घाईगडबडीत दिली गेली. खेळपट्टीवर सामनाधिकार्याचा निर्णय कसोटी सामना संपण्याच्या काही तासांपूर्वीच आला, जे आयसीसीने घेतलेल्या अशा प्रकरणातील असामान्य होता. बीसीसीआय अधिकार्यांनुसार, पुन्हा समीक्षा केली जाऊ शकते. शक्य झाले, तर निकाल सरासरीपेक्षा कमी केला जाऊ शकतो. आयसीसीची दोन सदस्यीय समिती आता बीसीसीआयच्या आक्षेपावर लक्ष देणार आहे.
आयसीसीने दिलेल्या पिच रेटिंगनुसार खेळपट्ट्यांना खूप चांगले, चांगले, सरासरी, सरासरीपेक्षा कमी, खराब आणि अनफिट असे रेटिंग केले जाते. सरासरीपेक्षा कमी असलेल्यांना एक डिमेरिट पॉइंट, तीन वाईट आणि पाच डिमेरिट पॉइंट अतिखराब असल्याबद्दल दिले जातात. हे डिमेरिट पॉइंट पुढील पाच वर्षांसाठी वैध राहतील. जर एखाद्या मैदानाला 5 डिमेरिट पॉईंट्स मिळाले, तर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एका वर्षासाठी म्हणजे 12 महिन्यांची बंदी घातली जाऊ शकते.