मुंबई : राज्यात जुन्या सेवानिवृत्ती योजनेसाठी जवळपास 18 लाख कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी गोंधळ घातला. सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन न्याय मागण्यात आला. मात्र, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सदस्यांना गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.

कामगारांच्या संपावरून राज्यात पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. यावर 289 अन्वये सदस्य कपिल पाटील यांनी राज्यात सुरू झालेल्या संपामुळे जनतेचे हाल सुरू आहेत. संपावर चर्चा करावी, असे सांगितले. 18 लाख कर्मचारी संपावर असल्याने व्यवस्था कोसळली आहे. कामकाज बाजूला ठेवून सेवानिवृत्ती योजनेवर काय निर्णय घेणार ते सांगा, असा सवाल पाटील यांनी केला. तर, विक्रम काळे यांनी शासकीय कार्यालयांना 12 वाजले तरी टाळे आहे. ही नामुष्की सरकारला बघावी लागते. सर्व कर्मचार्‍यांना 1982 पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून, उगाच वेळ काढू पणा करीत आहे. यावर सरकारने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी करण्या आली.

यावेळी अभिजित वंजारी, विक्रम काळे, भाई जगताप, सतेज पाटील, मनीषा कायंदे, अनिकेत तटकरे या सदस्यांनी वेलमध्ये गोळा होत घोषणाबाजी केली. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी 10 मिनिटे सभागृह तहकूब केले. त्यानंतरही प्रश्नोत्तराच्या तासांत विधान परिषदेच्या आमदारांनी गोंधळ घातल्याने त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याची सूचना केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा