नवी दिल्‍ली : मध्य आणि दक्षिण आशियातील 15 शहरांपैकी 12 शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात भिवंडी देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे नमूद केले आहे.

स्वित्झर्लडंच्या आयक्यू एअर संस्थेने मंगळवारी प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. गेल्या वर्षी केलेल्या पाहणीत असे स्पष्ट झाले आहे की, भारताच्या प्रदूषणाच्या पातळीची सरासरी 2021 च्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. प्रदूषण 58.1 वरून 53.3 एमजी/एम3पर्यंत घसरले आहे. 15 पैकी 12 शहररात सर्वाधिक प्रदूषण आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक पातळीपेक्षा 60 टक्के शहरांत प्रदूषण आहे. ते सुमारे 7 टक्के अधिक आहे.

पर्यावरणाचे नियम 2022 मध्ये शिथील केले गेले. कोळसा खाणकामाला अधिक प्रोत्साहन दिले गेले. त्या माध्यमातून औष्णिक
प्रकल्पातून मोठी वीज निर्मिती केली गेली. त्यामुळे वातावरणात उष्णता पसरली. नोव्हेंबरमध्ये कोळशाची आयात रोडावली. ती गेल्या दहा महिन्यांपेक्षा सर्वात कमी होती. पर्यायाने देशांतर्गत कोळसा उत्पादन 11.7 टक्के अर्थात 75.9 दशलक्ष टनाने वाढले, असे अहवालात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा