मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी तब्बल 897.28 अंकांनी कोसळला आणि 58,237.85 अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 258 अंकांच्या घसरणीसह 17,154.30 अंकांवर स्थिरावला. निर्देशांक 1.52 टक्के तर निफ्टी 1.48 टक्क्यांनी घसरला. निर्देशांक पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 6.6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तर या दरम्यान, निर्देशांक 2000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. काल गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे. काल इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स हे निफ्टी घसरले. तर टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स, ओएनजीसी आणि एचयूएल हे शेअर्स वधारलेले होते. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या वृत्ताचे काल शेअर बाजारात मोठे पडसाद उमटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा