सलूनच्या दुकानावर एक पाटी वाचली..
आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू…
इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं…
तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार..
चहाच्या टपरीवर असा फलक होता…
मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो.
एका उपाहारगृहाच्या फलकावर वेगळाच मजकूर होता..
इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या
इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून मन भरून आलं ..
आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा..
पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा…
फळं विकणार्‍या माणसाने कमालच केली…
तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ…
घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता.
पळणार्‍या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा..
ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं…
या आणि फक्त 100 रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा…
हसत रहा… हसवत रहा… स्वस्थ रहा, मस्त रहा!


माणुस कितीही मोठा असू द्या……
सासुरवाडीला त्याला बायकोच्या नावानेचं ओळखतात..
बबीचा नवरा….!


पुणेरी आमंत्रण
‘एकदा तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवाचंय’
कोण कोणाला जेवायला बोलावणार हे शेवटपर्यंत कळत नाही!

वाईट वेळेची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला ते लोक देखील सल्ले द्यायला लागतात जे स्वतः कोणत्याही गोष्टीसाठी सक्षम देखील नसतात. खरी सुंदरता तर हृदयात आणि आत्म्यात असते, माहीत नाही का सर्व लोक तिला कपड्यांमध्ये आणि चेहर्‍यामध्ये बघत असतात?
कुलुपाकडून सोबत राहण्याची गोष्ट शिका कारण ते कुलूप तुटते तरी देखील त्याची चावी बदलत नाही. किती विचित्र आहे हे जीवन जे खेळण्यापासून सुरू झाले होते आणि आता स्वतः एक खेळणं बनून राहिली आहे.
तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल किंवा नात्यांमध्ये पुढे जायचे असेल तर हृदयाला खूप मजबूत बनवावे लागते, कारण जो कमजोर असतो तो न प्रेम निभावू शकत, न नाते निभावू शकत!

ताकद जीवन आहे आणि कमजोरी हा मृत्यू आहे. कमजोर मनुष्यासाठी या जगात कोणतीच जागा नाहीये, मग ती कमजोरी शरीराची असू देत, मनाची असू दे किंवा धनाची! जर तुम्ही शरीराने कमजोर आहात तर पुन्हा पुन्हा आजारी व्हाल, स्वतःची सुरक्षा करू शकणार नाही, कायम घाबरत घाबरत जीवन जगाल आणि घाबरणार्‍या लोकांचा हे जग कायम खिल्ली उडवत असते. जर तुम्ही मनाने कमजोर आहात तर कोणीही तुम्हाला उल्लू बनवून जाईल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर घाबरून जाल, कायम तणावात राहाल आणि जीवनात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. कारण तुमचे कमजोर मन तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही, तुम्हाला ते हिंमत लावूच देणार नाही जी जीवनात पुढे जाण्यासाठी खूप जास्त महत्वाची असते.

जर तुम्ही धनाच्या म्हणजे पैशाच्या बाबतीत कमजोर असाल तर तुमची समाजात आणि मित्रपरिवार मध्ये काहीच इज्जत नसेल, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या इच्छा देखील पूर्ण करू शकणार नाहीत. तुमचे संपूर्ण जीवन पैशाच्या कमजोरी मुळे डगमगत आणि तळमळत निघून जाईल. जर तुम्ही दुर्बल राहिलात तर आयुष्यभर दुसर्‍याची गुलामी करत रहाल. आणि ज्यांना या सर्व गोष्टी बिनकामाच्या वाटत असतील त्यांना सांगू इच्छितो की गरीबाच कोणी आपलं नसतं, त्याची कोणी इज्जत करत नाही आणि कदरही करत नाही! त्यामुळे जीवनात सकारात्मक विचारांच्या सोबत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा, आपल्या जीवनात ते सर्व मिळवा ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. बिनकामाच्या सल्ल्यांकडे लक्ष न देता जीवनात फक्त पुढे वाटचाल करण्याकडे लक्ष द्या.


सूनबाई : भाजी चिरताना बोट कापलंय, काय करू? हळद लावू की मलम
सासूबाई : थांब थांब अगं, त्याआधी कापलेल्या बोटाचे स्टेटस तर टाक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा