नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 809 वर पोहोचली. एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 46 लाख 90 हजार 936 वर पोहोचली. त्यापैकी, 4 कोटी 41 लाख 56 हजार 345 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 5 लाख 30 हजार 782 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. काल एका बळीची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के असून, मृत्युदर 1.19 टक्के आहे.गेल्या 24 तासांत 1 हजार 287 जणांनी, तर आतापर्यंत 2 अब्ज 20 कोटी 64 लाख 55 हजार 841 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसमात्रा घेतली. देशात कोरोना रुग्णसंख्येने 19 डिसेंबर 2020 रोजी एक कोटीचा टप्पा ओलांडला होता. तर 4 मे 2021 रोजी 2 कोटी, 23 जून रोजी 3 कोटी, तर 25 जानेवारी 2022 रोजी 4 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा