पिंपरी : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. ही घटना रविवारी (दि. 13) वाकड येथे घडली.

मधू मार्कंडेय असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या चेहर्‍यावर काही जखमा आढळल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचे काम करायची. ती व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने रविवारी तिच्या मैत्रीणीसोबत भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होती. तिथे तिला अचानक चक्कर आली आणि खाली कोसळली. तिला दातखिळी बसली होती. तिच्या मैत्रिणीने दातखिळी काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या मैत्रिणीने तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तिला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.

त्यामुळे तिला तातडीने वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर मधूला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मधूच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. वाकड पोलिसांनी मात्र तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नाही असे सांगितले असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.

मधूच्या पतीने पंधरा दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. ती दोन मुलांसह राहाटणीत राहत होती. तिच्यासोबत गेलेली मैत्रीणीबाबत कोणाला माहीत नाही. म्हणून नातेवाईकांनी तिच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, मधू ही अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण आहे. भाग्यश्री देवयानी (जुनी) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा