जयंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यानातील फुलाला अल्फा लावल चषक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने 26 वे फुले-फळे भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करणेत आले होते.सदर स्पर्धेत जयंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान सहकारनगर, पुणे यांच्या (फुलांचा राजा, अल्फा लावल चषक) फिक्कट गुलाबी रंगाच्या गुलाबाला तर (फुलांची राणी, खिंवसरा चषक) लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलाला प्राप्त झालेला आहे.
त्याचप्रमाणे खाजगी बाग शौकीनांच्या मर्यादीत गटात जास्तीत जास्त बक्षिसे प्रथम 5 दितीय 12 तृतीय 14 अशी एकुण 31 बक्षिसे संजय मेहता, खडकी यांना मिळालेमुळे आयुक्त चषक तर खुल्या गटात जास्तीत जास्त प्रथम 14 दितीय 19 तृतीय 24 अशी एकुण 57 बक्षिसे लक्ष्मीफ्लॉवर अँन्ड डेकोरेशन, लांडेवाडी भोसरी भारत दिलीप भुजबळ यांना मिळाल्यामुळे महापौर चषक प्राप्त झाला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, सुभाष इंगळे, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी उपस्थित होते.