नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूला अजून एक आठवडाही झाला नाही, तर त्यांचा मित्र विकास मालूकडे संशयाची सुई जात आहे. जेव्हा सतीश कौशिक यांची प्रकृती बिघडली तेव्हा ते कुबेर ग्रुपचे मालक विकास मालूच्या घरी होते, असे विकास मालूच्या दुसर्‍या पत्नीने एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.

तक्रारीमध्ये सान्वी मालूने दावा केला की, 23 ऑगस्ट 2022 रोजी तिचा पती विकास मालू याने दुबईमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिनेते सतीश कौशिक उपस्थित होते. या पार्टीत दाऊद इब्राहीमचा मुलगा हजर असल्याचे विकास मालूने आपल्याला सांगितल्याचा दावा पत्नीने केला आहे. या पार्टीच्या अगोदरच सतीश कौशिक विकास मालूच्या घरी गेले होते आणि त्यांच्यात 15 कोटींवरून वाद झाला होता. सान्वी मालूच्या दाव्याने या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेतून बघितले जात आहे. मी सतीश यांच्या मृत्यूसंदर्भात तक्रार दिली असून, ते एका पार्टीसाठी माझ्या पतीच्या फार्म हाऊसवर आले होते. तेथेच त्यांची प्रकृती बिघडली होती. शिवाय फार्महाऊसवर काही विघातक औषधे सापडली आहेत, असे विकास मालूची पत्नी सान्वीने म्हटले आहे. सान्वीने दावा केल्यानुसार दुबईच्या पार्टीत दाऊदचा मुलगा सहभागी झाला असेल, तर त्याचा या प्रकरणाशी संबंध काय? याबाबत कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा