पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला समितीच्या वतीने ‘महिला सुरक्षा आणि स्वच्छता -मेडिको-, कायदेशीर उपाय’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

टिमविच्या प्र-कुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने, डॉ. रोहिणी होनप, शीतल बाबर डॉ. निमरजीत कौर राजपाल आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, महिला कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, तसेच त्यांच्या भौतिक सुरक्षेत वाढ व्हावी. महिलांना कायमच समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र जिथे प्रश्‍न आहेत. तिथे उपायही असतात. महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने अस्तित्व सिद्ध करत असल्याचेही डॉ. टिळक यांनी सांगितले.

प्रथम संसाधन व्यक्ती अधिवक्ता शीतल बाबर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. निमरजीत कौर राजपाल यांनी मासिक पाळीच्या आरोग्याच्या संदर्भात उद्भवणार्‍या समस्यांचे निराकरण केले आणि आयुर्वेद क्रीम आणि उपायांसह त्यावर उपाय करण्याचा सल्ला दिला. डॉ. रोहिणी होनप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रो. पर्पेटुआ फर्नांडिस यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा