डॉ. दिनेश कुमार झा

भारताच्या जी20 अध्यक्षते अंतर्गत युवा-20 (वाय-20) सल्ला मसलत सत्राचे 11 मार्च 2023 रोजी सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) आयोजन करत आहे. पुण्यातील लव्हाळे येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित या वाय-20 सल्ला मसलत सत्राची ‘शांतता निर्माण आणि सलोखा: युद्ध विरहित युगाची सुरुवात- वसुधैव कुटुंबकमचे तत्त्वज्ञान’ ही संकल्पना आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने होणार्‍या या सल्ला मसलत सत्रात भारतासह जी-20 देशांतील तरुणांना, चर्चा करण्यासाठी तसेच रचनात्मक धोरणांची आखणी करण्याकरिता कशी संधी आहे याचा थोडक्यात आढावा .

यंदा भारत जी-20चे अध्यक्षपद भूषवीत आहे. वाय-20 किंवा यूथ 20 हा जी-20 च्या अंतर्गत असलेला एक अधिकारिक सहभागी समूह आहे, जो जी-20 देशांच्या युवकांना एक मंच प्रदान करतो. वाय-20 एंगेजमेंट समूहात भारताचा मुख्य भर जगभरातील युवा नेत्यांमध्ये एकत्रितपणे विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणे आणि कार्यक्रम तयार करणे यावर आहे. वाय-20 भारत शिखर परिषद आणि वाय-20 सल्ला मसलत हे भारताच्या युवककेंद्री प्रयत्नांचे उदाहरण असेल आणि यामुळे मूल्य व धोरणात्मक उपायांचे सादरीकरण करण्याची संधी लाभेल, ज्यामुळे या शिखर परिषदेत आणि वाय-20 सल्ला मसलत यात भारताचे नेतृत्व युवा समूहात उभे राहू शकेल.

भारत तरुणांचा देश आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा युवक आहेत. युवावर्गावरच सर्व भविष्य अवलंबून आहे. भविष्य युवावर्गाचे आहे, – त्यांचा आवाज, मते आणि दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेदरम्यान ऐकला आणि मानला गेला पाहिजे. याशिवाय, आज लोकसंख्येचा सर्वात महत्वपूर्ण आणि गतिमान हिस्सा असल्याच्या नात्याने, युवा जी भूमिका निभावू शकतात आणि ज्या जबाबदार्‍या सांभाळू शकतात, त्यामुळे आपल्या ’वन वर्ल्ड’चे भविष्य बनण्यात आणि त्याला आकार देण्यात मदत होऊ शकेल आणि आपले उत्तरदायित्व आहे की, त्यांचे योग्य पोषण होईल आणि त्यांना मार्गदर्शन मिळेल, ज्यायोगे पुढे जाण्यासोबतच ते विकास प्रक्रियेत उचित उन्नतिसह सार्थक परिवर्तन घडवून आणू शकतील.

संवाद आणि परस्पर सामंजस्य

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अशांत युगात जग हे मानवाच्या अस्तित्वासाठी विभिन्न आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करत आहे. नव्या युगातील संघर्ष, महामारी, हवामान बदल, शस्त्रास्त्र स्पर्धा आणि अन्य प्रकारांनी विकसित आणि विकसनशील देशांमधील वाढत्या दरीबरोबर जागतिक शांतता आणि सुरक्षेमध्ये गंभीर पेच निर्माण केला आहे. या आव्हानांचे उपशमन करण्यासाठी आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी, बहुपक्षीय जोडणीला प्राधान्य देणे तसेच विविध संस्कृतीदरम्यान संवाद आणि परस्पर सामंजस्याला प्रोत्साहन देणे आवश्यक ठरते.

शांतता आणि सलोखा निर्माण प्रक्रिया जटिल आणि बहुआयामी आहे. यासाठी व्यक्ती आणि समुदायाला एकत्रितपणे काम करण्याची, भूतकालीन आघाड्यांच्या सामना करण्याची तसेच भविष्यासाठी एक सामायिक दृष्टिकोन बनविण्याची आवश्यकता आहे. शांतता प्राप्त करणे हे केवळ राजनैतिक आणि राजकारणी व्यक्तींचे काम नाही. हे सर्वांचे काम आहे. जरी तुम्ही एक विद्यार्थी असाल, एका समुदायाचे नेते असाल, किंवा एक चिंताग्रस्त नागरिक असाल, एका अधिक शांततामय जगाच्या निर्मितीसाठी आपली भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

आज संपूर्ण जग युद्ध, दहशतवाद, विस्तारवाद यांनी त्रासले आहे. कोविडसारख्या जागतिक समस्या आणि काही अत्यंत बेजबाबदार राष्ट्रे आपल्या हालचालींनी समस्त मानवी सभ्यतेला धोकादायक परिस्थितीकडे लोटू शकतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जागतिक शांतता धोक्यात आली आहे, तसेच भयानक मानवी शोकांतिका निर्माण होऊ घातली आहे.

या सर्व परिस्थितीचा आपल्याला सामना करायचा आहे. आपण जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून विकास आणि समृद्धीची दिशा दाखवून दिली आहे. तिथला युवावर्ग आता रचनात्मक भूमिकेत देश आणि समाजाच्या विकासासाठी आपले योगदान देत आहेत. आपल्या उत्तर-पूर्व प्रदेशाची तर आता मुख्य प्रवाहातील प्रदेशापेक्षा अधिक प्रगती होत आहे. तिथला युवावर्ग हिंसक संघर्षाच्या रस्त्याचा त्याग करून सोनेरी भविष्याची स्वप्ने पाहत आहे, साकारही करीत आहे.पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या प्रदेशांसाठी विशेष कार्ययोजना बनविण्यात येत असून त्यांची अंमलबजावणीही होत आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री नियमितपणे इथे जातात आणि प्रगतीचा आढावा घेतात.

डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले दुर्गम मागास जिल्हे आकांक्षी जिल्हे म्हणून घोषित करून इथे नीति आयोगाच्या संरक्षणात निर्देशांकावर आधारित विकास कार्यक्रम राबविले जात आहेत. परिणामी, देशात नक्षलवादी घटनांमध्ये घट झाली आहे. युवक विकासाच्या रस्त्यावर चालू लागला आहे. दहशतवाद्यांनीही हार मानली आहे आणि त्यांना चौफेर पद्धतीने विस्कळीत आणि कमजोर केले गेले आहे. एक सकारात्मक चित्र निर्माण झाले असून विकास आणि समृद्धीचा दरवाजा उघडणारे वातावरण तयार झाले आहे.

मेक इन इंडिया

भारत सरकारच्या योजना ‘मेक इन इंडिया’, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय करियर सेना परियोजना, गरीब कल्याण रोजगार अभियान, पं. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, पी.एम. स्वनिधि योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, स्टैंड अप योजना, स्टार्ट अप योजना, युवावर्गाला सोनेरी भविष्य निर्माण करण्यास मदत करीत आहेत.

32 लाख अनुसूचित जातींच्या तरुणांना 3000 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात आहे. 40 हजार शिक्षकांच्या नियुक्तीमुळे 740 एकलव्य आदर्श निवासी विद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था सुनिश्चित होऊ शकेल. 15,000 कोटी रुपये प्रधानमंत्री पी.वी.टी.जी. विकास मिशनसाठी दिले जात आहेत. युवावर्गासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. अन्य कार्यक्रमांची यशस्वीताही युवकांच्या सक्रिय भागीदारीने सुनिश्चित केली जात आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून युवावर्गाला अधिक शक्तिशाली, समर्थ, रचनात्मक आणि विकासातील भागीदार बनविण्याचा आपला प्रयत्न आहे.

(लेखक केंद्रीय अनुसूचित जाती जमाती मंत्रालय येथे अतिरिक्त सचिव आहेत.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा