एक पर्यटक अशा एका शहरात आला जे सर्व उधारीमध्ये बुडाले होते. पर्यटकाने 500 रुपयांची नोट हॉटेलच्या काऊंटरवर ठेवली आणि म्हणाला, मी जातोय आत रुम बघायला.
हॉटेल मालक लगेच ते 500 रुपये घेऊन घी वाल्याकडे गेला व त्याची उधारी चुकती केली.
घी वाला ते 500 रुपये घेऊन दुधवाल्याकडे गेला व त्याची उधारी भागवली. दूधवाला गेला गायवाल्याकडे. त्याने त्याची 500 रुपयांची उधारी दिली. गायवाला लगेचच चारावाल्याकडे गेला आणि 500 रुपयांची उधारी दिली. चारावाला गेला त्याच हॉटेलमध्ये जिथे तो कधी उधारीवर काही खात होता. त्याने ते 500 रुपये हॉटेलवाल्याला दिले. तेवढ्यात तो पर्यटक परत काऊंटरवर आला आणि म्हणाला मला रूम पसंत नाही. त्या हॉटेल मालकाने तेच 500 रुपये त्याला परत दिले.
ना कुणी कुणाला दिले ना कुणी घेतले
सगळ्यांचा हिशेब चुकता झाला. आता सांगा गडबड कुठे झाली.
गडबड कुठेच नाही तर हा सगळ्यांचा गैरसमज आहे की पैसे माझे आहेत. रिकाम्या हाताने आलो होतो
आणि रिकाम्या हातानेच जाणार. विचार करा आणि जीवनाचा आनंद घ्या. सदैव सुखी राहा, मस्त राहा, हसत खेळत राहा.
विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारलं कडू, ऊस गोड तर,
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे! तसाच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो…
84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही…!
घरात जर तीन भाऊ असतील तर एकाने शेती केली पाहिजे, दुसर्याने नोकरी केली पाहिजे, तिसर्याने व्यवसाय-व्यापार केला पाहिजे. यामुळे तिघांपैकी कोणाच्याही कामात मंदी आली तरी कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटत नाही.
तसेच, जर कोणाचे कुटुंब राजकारणात (हल्ली याला समाजकारण म्हणतात) असेल तर त्यापैकी एक जण काँग्रेसमध्ये असला पाहिजे, दुसरा भाजपमध्ये असला पाहिजे आणि तिसरा शिवसेनेमध्ये असला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही पक्षाची सत्ता जरी आली तरी त्याचा फायदा सर्व कुटुंबाला घेता येतो!