नवी दिल्ली : देशातील फरार व्यावसायिक विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून एक जोरदार धक्का मिळालेला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून संपत्ती जप्त करण्याचा निर्णय दिला होता. मल्याने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याच्या वकिलांनी अशिलाकडून कोणतीही माहिती मिळालेली नसून ते स्वतः अंधारात असल्याचा दावा केला. मल्याचे वकील बऱ्याच मुद्द्यांबाबत स्पष्ट नव्हते. नोव्हेंबर २०२२ मध्ये वकिलांनी केस लढण्यास नकार दिलेला. विजय मल्ल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात काही आर्थिक वाद आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीत इसी अग्रवाल यांनी न्या. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाला सांगितले की,” माझया माहितीनुसार विजय मल्ल्या अजूनही ब्रिटन मध्ये आहेत. ते माझ्या संपर्कात नाही. त्यांचा केवळ ईमेल पत्ता आहे. त्यांचा शोध घेण्यास आम्ही असमर्थ आहोत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करण्यापासून मला मुक्त करावे अशी विनंती केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा