मुंबई, (प्रतिनिधी) : बुलडाणा येथे बारावीचा गणित विषयाचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. असे प्रकार सातत्याने घडत आहेत, सरकार काय झोपले का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाला कारवाई करण्याची सूचना यावेळी केली. दरम्यान, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून लवकरच यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रकरणामुळे अभ्यास करणार्‍या मुलांचे नुकसान होत असून यामागे कोणते ‘रॅकेट’ कार्यरत आहे का? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी सभागृहात केली.

यासंदर्भात ते म्हणाले की, बारावीचे पेपर सुरू आहेत. सकाळी साडेदहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसांत राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणार्‍या मुलांवर हा अन्याय आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा