कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांचा विजय होताच समाज माध्यमांवर गंमतीशीर तसेच टोकदार प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्याची झलक….
भाजपा, कसं बा?
ये तो होना ही था
कसब्याने केली सुटका,
’कोथरूड’ने छळले होते!
दंगे-कर आमचे ‘राष्ट्रकार्य’
आहे. पण ‘द’चा ‘ध’ केल्यावर
धोबीपछाड मिळतो हे माहित नव्हतं!
पैशांच्या वादळात जहाजांचा ताफा बुडाला. इकडे मेहनतीच्या
तराफ्यावरुन धंगेकरांनी किनारा गाठला.
पुणेकरांनी ’हात’ दाखवला!
जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना गृहीत धरले जाते, पैशांचा बेसुमार वापर होतो आणि बळाचा वापर होतो, तेव्हा निवडणूक मतदारांच्या हातात येते आणि विजय सामान्यांचा होतो.
याला पुणेरी शुद्ध भाषेत म्हणतात माज उतरवला!
दणदणीत नकाराला सुरुवात
कसब्यात मविआचे धंगेकर जिंकले म्हणे…
ञ्च्थहे ळी ऊहरपसशज्ञरी विचारणारे कुठे आहेत सध्या?
मुक्ताताई, कसब्याने तुम्हाला खर्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली!
2000 रुपये
भाबडा प्रश्न
मतदारांना इंद्र आवडतात का?
नरेंद्र, देवेंद्र, रवींद्र
पुण्यातील पुण्येश्वर पावला की कोपला?
साम दाम दंड भेदाची अजस्त्र यंत्रणा वापरल्याचा
एक फायदा नक्की झाला… डिपॉझिट वाचलं!!
एकीचे बळ म्हणजे ‘कसबा‘
बंडखोरी केलीत तर चिंचवड
आणि या देखील प्रतिक्रिया…
कसब्यात ईव्हीएम निर्दोष; पण चिंचवडमधील ईव्हीएम हॅक करण्यात आली!
कसबा निकाल जागतिक प्रभाव टाकणारा. पण चिंचवडचा स्थानिक, बरं का!
आता उद्धव, संजय वगैरेंच्या उन्मादी वल्गना ऐकाव्या लागणारेत !
