शेअर बाजारात निर्देशांकाची उसळी

नवी दिल्‍ली : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात शुक्रवारी तेजी आली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसांत 3.43 लाख कोटी रुपये कमावले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 900 ने वाढला. 899.62 ने वाढून तो 59 हजार 808.97 बंद झाला. दिवसभरात 1.79 टक्के वाढून 59 हजार 967.04 वर तो पोहोचला होता. शेअर बाजारातील भांडवल 2 लाख 63 हजार 42, 218.11 कोटीवरून 3 लाख 43 हजार 173.59 कोटीवर पोहोचले. त्यामुळे वाढत्या महागाईचा शेअर बाजारावर परिणाम झाला नसल्याचे दिसले. सार्वजनिक बँकांच्या अहवालानुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाचे समभाग तेजीत होते. त्यामुळे समूहाचे समभाग सुधारत असल्याचे चित्र होते. परदेशी गुंतवणूकदारांनी 12 हजार 770 .81 कोटींची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, अदानी समूहाने आपल्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यामध्ये अमेरिकेतील जीक्यूजीमध्ये 15 हजार 446 कोटी रुपये गुंतवले आहेत. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, रिलायन्स इंटस्ट्रीज, आयटीसी, टाटा स्टील, इंडसलॅेंड बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि टायटनचे समभाग तेजीत होते. टाटा मोटर्स, अल्ट्रा टेक सिमेंट, नेस्तले आणि आशियन पेंट्सचे समभाग घसरले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा