मुंबई : भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बक्षिसाचे वितरण करण्याची संधी मिळाली आहे. 12 मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी गीत, वैशिष्ट्यपूर्ण माहितीपट आणि लघुपटासाठी भारताला तीन नामांकने मिळाली आहेत. त्यात एसएस राजमौली यांच्या चित्रपटातील नट्टू नट्टू गाणे, शौनक सेन यांचा वैशिष्ट्यपूणर्ं माहितीपट ऑल दॅट ब्रिथ आणि गुनीत मोंगा यांचा लघुपट एलिफंट व्हिस्पर यांचा समावेश आहे. दरम्यान, पुरस्कार सोहळ्यात दीपिका पादुकोण ही एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, ग्लेन क्लोज, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी जॉर्डन, जेनेल मोने, झो साल्डाना, जेनिफर कोनेली, रिझ अहमद आणि मेलिसा मॅककार्थी यांच्यासोबत सामील होणार आहे.

यापूर्वी दीपिका जागतिक पुरस्कार सोहळ्यात दिसली होती. 2022 मध्ये अमृत महोत्सवी कान्स चित्रपट महोत्सवाची परीक्षक होती. अर्जेटिंना आणि फ्रान्समध्ये झालेला फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात ती दिसली होती. अभिनेता शाहरूख खान यांच्यासोबत अभिनय केलेला पठाण चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. पठाणने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याबरोबर तो जगभर प्रचंड गाजला होता. सध्या ती महानायक अमिताभ बच्चन आणि बाहुबली फेम प्रभास यांच्याबरोबर प्रोजेक्ट के या चित्रपटात काम करत आहे. विज्ञानाचे कथानक असलेला हा चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा