नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर बरेच आरोप झाले होते. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अर्ज दाखल झाला होता. आज न्यायालयात याबाबत सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ला दोन महिन्यात अदानी समूहाची हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच सहा सदस्यांची एक समिती स्थापन करुन ही समिती देखील सेबीसोबत चौकशीत सहभागी होणार आहे.

चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती अदानी समूह आणि हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करुन अहवाल तयार करेल. निवृत्त न्यायाधीश अभय सप्रे हे या समितीचे अध्यक्ष असतील. तर त्यांच्यासोबत ओपी भट्ट, न्यायमूर्ती जेपी देवधर, के. व्ही. कामत, नंदन नीलकेनी आणि सोमशेखर सुंदरेशन हे देखील असतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा