अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील मन्याळे येथे आई व तिच्या दोन तरुण मुलींनी आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. सुनिता अनिल जाधव (वय 48), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22) आणि शीतल अनिल जाधव (वय 18) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

आई सुनिता जाधव हिने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली, तर तिच्या दोन्ही मुलींनी गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिघींच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आईने आत्महत्या केल्याचे पाहून नंतर मुलींनी आपले जीवन संपविले असा प्राथमिक अंदाज आहे. मुलींनी आधी आत्महत्या केली. ते पाहून आईने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.पोलीस तपासानंतरच आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होईल. तिघींचेही मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा