प्रियांका चोप्राकडून माहितीपटाचे कौतुक

लॉस एंजलीस : द एलिफंट व्हिस्फर हा माहितीपट ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. त्याबाबत आनंद व्यक्‍त करताना माहितीपटाचे कौतुक अभिनेत्री पियांका चोप्राने भावनेने ओथंबलेली सोंड, असे केले आहे.

द एलिफंट व्हितस्फर माहितीपट हृदयाला हात घालणार आहे. अशा प्रकारचा भावनेला हात घालणारा माहितीपट मी नुकताच पाहिला आहे. तमिळ भाषेत तो तयार केला आहे. कार्तिकी गोंझालवीस दिग्दर्शक असून तो नुकताच 95 व्या अ‍ॅकाडमी अ‍ॅवॉर्डसाठी लघुपटाच्या मथळ्याखाली नामांकित झाला आहे. त्यावर आनंद व्यक्‍त करताना प्रियांकाने ट्विट केले. भावनेने ओथंबलेली सोंड असे माहितीपटाचे कौतुक तिने केले. हृदयाला हात घालणारा तो असल्याचे ती म्हणाली. हत्तीच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन त्यात दिसते. सध्या द एलिफंट व्हिस्फर माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. त्यात राघू आणि अम्मू या हत्तींची माहुताबरोबरच झालेली ताटातूट दाखविली आहे. दक्षिण भारतातील आदिवासी दांपत्य बोम्मन आणि बेली यांच्यावर कथानक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा