मराठी भाषा दिन नुकताच झाला. या निमित्ताने-
मराठी भाषा गीत
नाच रे मुला मराठीच्या अंगणात
नाच रे मुला नाच ॥धृ॥
बाराखडीची वेल जरा पाहून घे
अक्षरांच्या कळ्या जरा खुडून घे
एका एका अक्षराने गुच्छ कर शब्दांचा
शब्दांच्या सवे तू नाऽऽच ॥1॥
काना, मात्रा, वेलांटीला समजून घे
अनुस्वार-ऊकाराने नटवून दे
अक्षरांचे रुप मग खुले तुझ्या हाती
सुगंध संगे त्या नाऽऽच ॥2॥
यमक आणि अलंकार वाटा नव्या
वाक्यांच्या जाती सार्या माहीत हव्या
निबंधात रंगून पत्रात हरवून
कवितेशी खेळून नाऽऽच ॥3॥
गाणी, गोष्टी कवितांशी मैत्री करून
साहित्याचा वसा तू हाती धरून
जीवनात समृद्धी भाषेनेच येई
हृदयाशी जपून नाऽऽच ॥4॥
शब्दांची फुलबाग मोहरून आली
पाठोपाठ शब्दांची गर्दी उडाली
चला आता फेर धरू मराठीचे गाणे गाऊ
आनंद पेरत नाऽऽच ॥5॥
- शिल्पा चिटणीस
कोथरूड, पुणे. मो. 7588865053
‘मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
देण्यात दिन जाईल सरून…
उद्या विसरणार सारे आपला –
मराठी बाणा मी सांगते स्मरून…
किती वाईट दिस आले –
मायबोलीचे कैवारी गेले हारून…
हाय-हॅलो थँक्यू ने –
महाराष्ट्र गेला हेलावून …
चला करु ‘पण’ सारे –
या फूकाच्या शब्दांना मारुया टाळे …
आई-बाबा नि मातृभाषा दिन –
त्यांच्या समोर होऊ आपण लीन …
उरी असावा अभिमान नि राखावा स्वाभिमान –
मराठी मायबोली आमची हीच आमची शान…’
- प्राजक्ता पारसनीस
मो. 7875554516