नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत देशाचा विकासदर घसरला आहे. या कालावधीत विकासदर 4.4 पर्यंत घसरला. त्याआधी, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हा दर 6.3 टक्के इतका होता. त्या तुलनेत तिसर्‍या तिमाहीत आर्थिक वाढीचा वेग 1.9 टक्क्यांनी घसरला.सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विकास दर 9.1 टक्के इतका होता. तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर हा 3.7 टक्के इतका नोंदवण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा