म्हातारपणाची सर्व लक्षणं समजून घ्या आणि ठरवा की, तुम्ही किती म्हातारे झाला आहात!
मित्र बोलावत आहेत; परंतु तुम्हाला जावंसं वाटत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
मस्त मौजमस्ती करणार्या लहान मुलांवर कारण नसताना चिडलात, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
रेडिओवर सुमधुर गीतांचा कार्यक्रम चालू आहे आणि डोक्याला बाम
लावावासा वाटत असेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
धमाल मस्तीचा सिनेमा सुरू आहे आणि तुम्ही टीका करायला सुरुवात करता, तर समजा तुम्ही
म्हातारे झाला आहात.
मस्त मजेत मैफल चालू आहे आणि तुम्ही सल्ला द्यायला सुरुवात करता, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
नवीन कपडे खरेदी करायची इच्छा होत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
नवतरूणांच्या कपड्यांवर वारंवार टिप्पण्या करीत असाल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
फुलांवर भ्रमर बघून रोमँटिक गीत आठवत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
रेस्टॉरंटमध्ये जाऊन घरच्या अन्नाची स्तुती करायला लागलात, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
बेफिकिरी सोडून डोक्यावर चिंतेच्या टोपल्या ठेवायला लागलात, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
पावसात भिजायचा आनंद सोडून छत्री आठवत असेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
ग्रुपमध्ये आलेल्या सर्व पोस्टना कंटाळला असाल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.
