गोपेश्‍वर : उत्तराखंडच्या जोशीमठ परिसरातील जलवाहिनी रविवारी फुतटली. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
जोशीमठ गावातील जमीन काही दिवसांपूर्वी खचली होती. त्यामुळे शेकडो कुटुंबे घरांना तडे गेल्यामुळे निर्वासित झाले आहेत. अनेकांनी स्थलांतर केले आहे. आता पाणीपुरवठा करणारी वाहिनी फुटली. भूर्भात ही वाहिनी होती. तिलाच तडे गेले आहेत. विशेष म्हणजे 2 आणि 3 जानेवारी रोजी जे. पी. कॉलनी परिसरात अचानक जमिनीतून पाणी बाहेर आले होते. परिसराची पाहणी अधिकार्‍यांनी केली तेव्हा जलवाहिनी फुटल्याचे उघड झाले, अशी माहिती कार्यकारी अभियंते राजेश नारीवाल यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई करुन दोन टाक्यांतील पाणीपुरवठा दुपारी एक वाजता रोखला आहे. येथील प्रख्यात नृसिंह मंदिराकडे जाणार्‍या जलवाहिनीला तडे गेल्याची माहिती नारीवाल यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा