नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील बाजारात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात अल्पशी वाढ झाली. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे 50 रुपयांनी तर चांदीचे दर प्रति किलोमागे १४० रुपयांनी वाढले.
सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी 56 हजार 307 रुपये तर चांदीचा दर प्रति किलोसाठी 65 हजार 770 रुपये झाला होता, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीने दिली.
या पूर्वी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी 56 हजार 257 रुपये होता. त्यात 50 रुपयांची वाढ झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक सौमील गांधी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अनुक्रमे 1 हजार 845 डॉलर आणि 21.82 डॉलर प्रति औंस होते.