समस्या ह्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात.. वाईट, नकोसे प्रसंग घडत असतात.. मात्र त्यातून खचून जाऊन नकारात्मक मानसिकता तयार न करता सकारात्मकता टिकवून ठेवलीच पाहिजे आणि जो आहे त्याच मार्गावर कार्यरतही राहीलं पाहिजे.. कारण एक वाईट अनुभव आला की संपलं सगळं असं नसतं ना.. जीवनाच्या वाटेवर वेळोवेळी असे प्रसंग येतच असतात.. त्यांची तीच तर नियती आहे.. म्हणून काही सकारत्मकता नाहीशी होत नसते.. उलट नकारात्मक विचारांनी कामावरही परिणाम होतो.. सरता काळ हा प्रत्येक
दुःखांवरचं औषध असतो.. म्हणून अपयश किंवा दु:खाने खचून न जाता पुढचा प्रवास सुरुच ठेवला पाहीजे…
विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंतसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो!
शाळेतील एक आठवण…
पेपर सुटल्यानंतर मित्रांनी सोडविलेले गणिताचे उत्तर 0.8 असेल की 0.08 याचा वाद चाललेला असायचा…
आणि आपण मात्र गुपचुप विचार करीत असे. आपलं उत्तर 1700 कुठून आले?