सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करणारे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सडेतोड उत्तर दिले आहे. ते सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहेत.

जयशंकर म्हणाले, सोरोस हे न्यूयॉर्कमधील एक श्रीमंत व्यक्ती असून, त्यांना वाटते आपल्या विचारांनी संपूर्ण जग चालते. निवडणुकीत त्यांनी निवडलेला उमेदवाराचा विजय झाला नाही तर लोकशाहीत अनेक त्रुटी त्यांना दिसतात. लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौल महत्त्वाचा असतो. निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्‍न चिन्ह कोणी उपस्थित करत नाही. जॉर्ज सोरोस यांचे मतप्रवाह हे धोकादायक आहेत.

जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियात पंतप्रधान अँथनी अलबानीज यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध, आर्थिक संधी आणि क्रिकेटसह इतर विषयांवर चर्चा केली. पुढील महिन्यात अलबानीज हे भारत भेटीवर येणार आहेत. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेला असणारा धोका लक्षात घेता समविचारी देशांनी एकत्रीत येण्याची गरज आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची भागीदारी बदलत्या जागतिक परिस्थितीत महत्त्वाची आहे. असेही जयशंकर यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा