प्रलयंकारी घटनांमुळे मानव हतबल

नवी दिल्‍ली : तुर्कस्तान, सीरियात सोमवारी पहाटे झालेल्या प्रलयंकारी भूकंपापूर्वी जगभरात झालेल्या भूकंपाची आठवणी जागत झाल्या आहेत. लाखो जणांचे हाकनाक बळी भूकंपाने घेतले होते. गेल्या काही वर्षांतील भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. नेपाळ ते तुर्कस्तान, अशी भूकंपाची मालिकाच सुरू आहे.

अफगाणिस्तानात जून 2022 मध्ये 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपात एक हजार जणांचा बळी घेतला तर, 1 हजार 500 जण जखमी झाले होते. पाकटीका प्रांतात सुमारे 4 हजार 500 घरांचे नुकसान झाले होते.

हैतीमध्ये ऑगस्ट 2021 मधये 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपात शेकडो जणांचे बळी गेले. शाळा, रुग्णालयांच्या इमारती कोसळल्या होत्या. 2020 नंतरचा सर्वात मोठी आपत्ती ठरली होती. त्यात 50 लाख मुलांचे भवितव्य अंधारात गेले होते.

नेपाळमध्ये 2015 मध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपात डोंगराळ भागातील 98 टक्के घराचे नुकसान झाले होते. देशात 1934 नंतरचा सर्वात मोठा भूकंप होता. त्यात आठ हजार जणांचा मृत्यू तर,21 हजार जखमी झाले होते. भक्‍तपूर आणि काठमांडू दरबार स्क्‍वेअर परिसरातील 80 टक्के मंदिरे आणि ऐतिहासिक इमारती जमिनदोस्त झाल्या होत्या.

पाकिस्तानात सप्टेंबर 2013 मध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपात बलुचिस्तान प्रांताच्या नैऋत्य भागातील गावे जमिनदोस्त झाली होती. प्रमुख्याने अवरान जिल्ह्याला त्याचा फटका मोठा बसला होता. कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद, लारकाना आणि लाहोरमध्ये हादरे जाणवले होते.भारतातील दिल्‍लीतील इमारती हादरल्या होत्या. मस्कत, ओमानमध्ये झटके जाणवले होते.

जपानमध्ये मार्च 2011 मध्ये टोहोकू शहरात 8.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात 19 हजार जणांचा मृत्यू तर, सहा हजार जखमी झाले होते. 21 शतकातील प्रलंयकारी भूकंप, अशी त्याची नोंद झाली आहे. भूकंपानंतर समुद्र किनार्‍यावर त्सुनामी आली होती. त्याचा फटका फुकुशीमा अणुवीज प्रकल्पाला बसला होता. रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीत 1986 नंतर झालेल्या भीषण स्फोटानंतरची ही घटना होती.

चीनमध्ये मे 2008 मध्ये 7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात 87 हजार जणांचा बळी गेला होता. 1 कोटी नागरिक बेघर झाले होते. सिंचून प्रांतातील डोंगराळ प्रांतात झालेल्या भूकंपात लाखो इमारतीची पडझड आणि नुकसान झाले होते. सुमारे 86 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. शाळेत 10 हजार मुलांचा मृत्यू झाला होता. 20 टक्के शाळेच्या इमारती कमकुवत झाल्या होत्या,

काश्मीरमध्ये ८ ऑक्टोबर 2005 मध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपात 75 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. लाखो नागरिक बेघर झाले होते. डोंगराळ भाग असल्याने तेथे मदतकार्य पोहोचविणे अवघड झाले होते.

अफगाणिस्तानात मे 1998 मध्ये हिंदूकुश पर्वताच्या परिसर दोन भूकंपाने हादरला होता. पहिला हादरा फेब्रुवारीत टखार प्रांतात बसला. त्यात 2 हजार 300 जांचा मृत्यू झाला होता. परंतु मृतांची संख्या 4 हजारांच्या आसपास असावी, असा अंदाज व्यक्‍त केला होता. दुसरा भूकंप मे महिन्यात 6.6 रिश्टर स्केलचा झाला. त्यात 4 हजार 700 जणांचा बळी गेला होता.

चिलीमध्ये मे 1960 मध्ये 9.5 रिश्टर स्केलचा सर्वात मोठ्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीने कहर केला. त्सुनामीच्या लाटांची उंची 30 फूट होती. त्यात गावेच्या गावे नष्ट झाली. सुमारे 2 हजार नागरिकांचा बळी गेला होता.

हैतीमधील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती

हैतीमध्ये 2010 मध्ये 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. 12 जानेवारी 2010 रोजी झालेल्या भूकंपात 2 लाख 30 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. शेकडोंच्या संख्येने नागरिक बेघर झाले होते. या शक्‍तीशाली भूकंपामुळे शेजारीला देश क्युबा आणि व्हेनेझ्युएला देखील हादरले होते. जगातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून भूकंपाची नोंद झाली आहे.

जपानमध्ये १ लाख ४३ हजार जणांचा बळी

जपानमध्ये 1 सप्टेंबर 1923 रोजी 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे हादरे टाक्यो ते योकोहामा शहरात जाणवले. त्यात इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. भूकंपानंतर त्सुनामीचे संकट आले होते. 40 फूट उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. वादळाचा तडाखा बसला होता. 1 लाख 43 जणांचा बळी गेला होता. योकोहामा शहरातील 90 टक्के इमारती जमिनदोस्त झाल्या होत्या. दोन पंचमांश टोकियो शहर उद्ध्वस्त झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा