उमेदवारीबाबत झाली चर्चा
पुणे: कसबा पोटनिवडणूकिसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. भाजपकडून अशामध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आणि बंद दाराआड 20 मिनिटे चर्चा झाली आहे. उमेदवारीबाबत चर्चा यावेळी झाली करण्यात आली . उमेदवारीची घोषणा दिल्लीमधून केली जाणार असल्यामुळे आता गुढ आणखीच वाढले आहे. भाजपकडून आज (शनिवारी) उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यामध्ये अद्याप महाविकास आघाडी अथवा भाजपने अद्याप उमेदवारीबाबात निर्णय घेण्यात आला नाही. टिळक कुटूंबातच उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी शैलेश टिळक यांच्याकडुन व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यात एका कार्यक्रमा निमित्ताने देवेंद्र फडणवीस कोथरूड येथे आले होते, त्यानंतर पुन्हा मुंबईला जाताना त्यांनी रात्री नऊच्या सुमारास केसरीवाडयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. तर रात्री रात्री सव्वा नऊच्या सुमारास फडणवीस , पालकमंत्री चंद्रकांत पाटील टिळक यांच्या घरी पोहचले. त्यानंतर पुढील पाच मिनिटात कुणाल टिळक, शैलेश टिळक, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाले. यावेळी इतर कोणालाही आत मध्ये सोडण्यात आले नव्हते. त्यानंतर रात्री पावने दहाच्या सुमारास फडणवीस बाहेर येऊन मुंबई कडे रवाना झाले. फडणवीस यांच्या या भेटीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही टिळक यांच्याशी संवाद साधला.मात्र, फडणवीस यांच्या या अचानक भेटीने चर्चांना उधान आले असून या भेटीतही उद्या दिल्लीतून तिकिट जाहीर होईल असे सांगण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा