पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे (वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, दोन नातवंडे, दोन बंधू, बहीण असा परिवार आहे.

डॉ. वाघमारे १९६५-६६ मध्ये अमेरिकेतील केंब्रिजमधील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून ते कार्यरत होते. तसेच नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. वाघमारे यांनी काम केले. त्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये १९६६ ते १९९७ या प्रदीर्घ काळात अध्यापन केले. तर सन २००० पासून ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा