२१ बेटांना परमवीरच्रक विजेत्यांची नावे

पोर्ट ब्लेअर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतिकृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे देण्यात आली. आता ही बेटे देशभक्तांसाठी प्रेरणास्थाने बनतील, असा विश्‍वास मोदी यांनी सोमवारी सांगितले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. या कार्यक्रमास मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण मोदी यांच्या हस्ते झाले. तसेच, अंदमान-निकोबारवरील 21 बेटांचे नामकरणही त्यांनी केली. आता ही बेटे परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.

या नावाने ओळखली जाणार बेटे

मेजर सोमनाथ शर्मा, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, 1965 च्या युद्धात पाकिस्तानचे पॅटर्न रणगाडे उद्ध्वस्त करणारे वीर अब्दुल हमीद, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जी. एस. सलारिया, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मेजर कुमार बत्रा, लेफ्टनंट कुमार बत्रा (सुभेदार) तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा